बायकोसोबतच्या वादानंतर पतीने बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच चिरला स्वत:चा गळा

औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकावरील घटना, संबंधित युवकावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू...

बायकोसोबतच्या वादानंतर पतीने बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच चिरला स्वत:चा गळा

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर एकाने आपल्या पत्नीसमोरच धारदार शस्त्राने स्वत:चा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भाऊसाहेब तुळशीराम काकडे (वय ३३,रा.धानोरा,ता.सिल्लोड) असे स्वत:चा गळा चिरून घेणाऱ्या युवकाचे नाव आहे.

घटनास्थळी पडलेले रक्त

याबाबत सविस्तर माहिती अशी, भाऊसाहेब काकडे याचे काही दिवसांपूर्वी राणी काकडे (वय.२३) या युवतीसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर पहिले सहा महिने दोघांत सर्वकाही अलबेल सुरू होते. पण त्यानंतर दोघांमध्ये छोट्या छोट्या कारणांतून वादाला सुरुवात झाली. पुढे वाद वाढतच गेले. एकमेंकासोबत सततच्या होणाऱ्या वादाला कंटाळून दोघांनी सोमवारी (दि.३०) रोजी बाँडवर घटस्फोट घेतला.

बाँडवर घटस्फोट घेतल्यानंतर दोघंही सोबत मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले. याठिकाणी दोघांत पुन्हा वादाला सुरुवात झाली. यावेळी राग अनावर झाल्यामुळे भाऊसाहेब याने धारदार शस्त्राने स्वत:चा गळा चिरून घेतला. या घटनेत भाऊसाहेब हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.