सुमित दंडुके / औरंगाबाद : औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे या मुद्द्यावर मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. नाशिक आणि पुण्यामध्ये मनसेने बसेसवरील औरंगाबादची पाटी काढून तिथे छत्रपती संभाजीनगर या नावाचे फलक लावले.
यापाठोपाठच आज मनसे कार्यकर्त्यांनी अमरावती बसस्टँड मधील औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेसवरील औरंगाबाद नावाचा बोर्ड फाडत त्या एस.टी बसेसवर छत्रपती संभाजीनगरचे बोर्ड लावले.
मनसेने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी २६ जानेवारी पर्यंतची मुदत राज्य सरकारला दिलेली आहे. तसे न झाल्यास याचे वाईट परिणाम सरकारला भोगावे लागेल असा इशाराही मनसेकडून देण्यात येत आहे.
नाशिक,पुणे नंतर अमरावतीमध्येही मनसे आक्रमक
राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांकडून एस.टी बसेसवरील औरंगाबादचा फलक काढून छत्रपती संभाजीनगरचा फलक लावण्यात येतोय...

Loading...