खा.संजय (बंडू) जाधव यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्तेही राजीनाम्याच्या तयारीत.

1 min read

खा.संजय (बंडू) जाधव यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्तेही राजीनाम्याच्या तयारीत.

आमचा नेता!आमचा स्वाभिमान!या टॅगलाइनने सोशल मीडियावर धुमाकूळ. कार्यकर्त्यासाठी स्वतःच्या पदाचा राजीनामा देणारे, राज्यातील नव्हे तर देशातील पहिले लोकप्रतिनिधी असल्याची कार्यकर्त्याची भावना.

सिध्देश्वर गिरी/परभणी: परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या राजीनाम्याने शिवसैनिकांमध्ये असंतोष उफाळला असून. कार्यकर्त्यासाठी स्वतःच्या पदाचा राजीनामा देणारे, राज्यातील नव्हे तर देशातील पहिले लोकप्रतिनिधी असल्याच्या भावनेतून शिवसेनेचे पदाधिकारीही राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
परभणी जिल्ह्यात शिवसेना रुजवण्यात मोठा वाटा असणारे खासदार संजय जाधव यांनी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शिवसैनिकांची नावे प्रशासक म्हणून घ्यावीत अशी विनंती पक्षाकडे केली होती.जिल्ह्यात विधानसभा सदस्यांमध्ये एकही सदस्य राष्ट्रवादीचा नसताना राष्ट्रवादीच्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समिती जाण्याचे संकेत दिसू लागल्याने शिवसैनिकांवर अन्याय होत आहे. या भूमिकेतून परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे पाठवला होता. या राजीनाम्याने एकच खळबळ उडाली,असतानाच जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून धुमाकूळ घालत खासदार संजय जाधव यांना पाठिंबा दर्शवला आहे.
मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ देत शिवसैनिकांवर व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचे काम केले आहे.गावपातळीवरील शिवसैनिक या अन्यायापासून सुटू शकलेला नाही.यातच खासदार जाधव यांनी शिफारस केलेल्या नावांना विरोध करत मर्जीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रशासक म्हणून नेमण्याचे षडयंत्र होत, असतानाच खासदार जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे पाठवला होता. या राजीनाम्यात कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर!पद काय कामाचे? असा उल्लेख देखील त्यांनी केला होता.
जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या राजीनाम्याला पाठिंबा दर्शवत आमचा नेता!आमचा स्वाभिमान!ही टॅगलाईन करून राजीनामा देणार असल्याचे सुचवले आहे.यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला उभारी देणाऱ्या नेतृत्वास मित्रपक्षाकडून त्रास दिला जात असल्याने. शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत ग्रामीण भागातील जुन्या-जाणत्या शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे.