प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आ.बोर्डीकर यांचे उपोषण मागे.

1 min read

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आ.बोर्डीकर यांचे उपोषण मागे.

लेखी आश्वासनानंतर सायंकाळी उपोषण स्थगीत करण्यात आल्याची माहिती आ.बोर्डीकर यांनी एनालायझरशी बोलताना दिली.

सिध्देश्वर गिरी/ परभणी: शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार मेघना बोर्डीकर यांनी सोमवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सायंकाळी उपोषण स्थगीत करण्यात आल्याची माहिती आ.बोर्डीकर यांनी एनालायझरशी बोलताना दिली.

यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे,माजी आमदार मोहन फड,माजी आ.रामराव वडकुते,भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे,ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे,बाळासाहेब जाधव,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर,अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,भाजपचे प्रमोद वाकोडकर,शशिकांत देशपांडे,संजय रिझवाणी,मंगल मुदगलकर,डॉ.विद्या चौधरी,विठ्ठलराव रबदडे,सुप्रिया कुलकर्णी,अभय चाटे यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आमदार बोर्डीकर यांना दिलेल्या लेखीपत्रात शासन निकषानुसार काही बधीत शेतकरी राहिले असल्यास, अशा शेतकर्‍यांची चौकशी करून त्यांना शासनाच्या निर्णयानुसार मदत देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. २०१८-१९ मधील कोरड्या दुष्काळाबाबत शासनाकडे ११२ कोटी ६७ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असल्याने, त्याबाबतही पाठपुरावा सुरू असल्याचे नमूद केले आहे.पीकविम्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल,शेतकरी पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने बुधवारी दिनांक चार रोजी आयोजित केलेल्या बैठकीतून आढावा घेतला जाईल व वंचित शेतकर्‍यांना नियमानुसार पीककर्ज वाटपाबाबत कारवाई केली जाईल,असेही नमूद करण्यात आले आहे.