वयातील अंतर ७६, तरी केला विवाह

1 min read

वयातील अंतर ७६, तरी केला विवाह

विवाहाच्यावेळी वय वर्ष १०३ असणारे पुआंग हे एका बाळाचे वडिल होणार आहेत.

अनेक वेळा आपण लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की, वय म्हणजे फक्त एक नंबर असतो याशिवाय काही नाही. याला सिद्ध करून दाखवले आहे इंडोनेशियात राहणारया १०३ वर्षीय पुआंग कट्टे नावाच्या व्यक्तीने. त्यांनी जवळ जवळ आपल्या पेक्षा ७६ वर्षापेक्षा छोट्या म्हणजेच २७ वर्षीय महिले सोबत विवाह करून जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

एका अहवालानुसार पुआंग एक डच कर्नल आहेत. त्यांनी १९४५-१९४९ च्या युद्धात सहभाग नोंदवला होता. वधूच्या इंडो अलंगच्या एका नातेवाईकाने सांगितले की, त्यांना हे माहित नव्हते की वराचे वय काय आहे परंतु त्यांना हे नक्की माहित होते की, त्यांनी वयाची शंभरावी ओलांडली आहे.

विवाहानंतर वधू-वराच्या खरया वयाचा खुलासा झाला तेव्हा सर्वजण अचंबितच झाले. असे सांगितले जात आहे की, वराने वधू मंडळींना हूंडा सुद्धा दिला आहे. त्यांनी महिलेला २५ हजार रूपये आणि एक सोन्याची अंगठी देवून तीच्याशी विवाह केला.

त्याचे झाले असे की, जेव्हा वधू आपल्या प्रियकरासोबत ब्रेकअप करण्यासाठी जात होती, तेव्हा पुआंग यांची तीच्याशी पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीकता वाढली आणि त्यांचे शारिरीक संबधही प्रस्तापित झाले. यादरम्यान ती महिला गरोदर राहिली आणि त्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. आज विवाहाच्यावेळी वय वर्ष १०३ असणारे पुआंग हे एका बाळाचे वडिल होणार आहेत.

स्थानिक अहवालानुसार पुआंगच्या पत्तीचा हा दुसरा विवाह आहे. त्यांनी आपल्या अगोदरच्या पतिसोबत घटस्फोट घेतला होता, कारण तो त्यांचा अपमान करत होता. आणि त्यांना मारतही होता. सध्या पुआंग आणि त्यांची नववधू दक्षिण सुलावेसी मध्ये पुआंगच्या घरी आरामात राहत आहेत.