ठाकरे-पवार करार, मी खुर्चीत बसतो, तुम्ही सत्ता चालवण्याचं कंत्राट घ्या- पाटील

1 min read

ठाकरे-पवार करार, मी खुर्चीत बसतो, तुम्ही सत्ता चालवण्याचं कंत्राट घ्या- पाटील

मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्याचा कंत्राट घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितले असेल. तसा त्यांच्यात करार झाला असेल, अशी बोचरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली

सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढीव वीज बिलासंदर्भात भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी त्यांना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. कदाचित मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्याचा कंत्राट घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितले असेल. तसा त्यांच्यात करार झाला असेल, अशी बोचरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. तेच बाहेर फिरत आहेत. उद्धव ठाकरे फिरतच नाहीत.कदाचित मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्याचा कंत्राट घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितले असेल. तसा त्यांच्यात करार झाला असेल म्हणून राज्यपालांनी राज ठाकरेंना तसे सांगितलं असावे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली.

सध्या लोकांना शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहज उपलब्ध होतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचे अशी लोक भावना झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे, राज ठाकरे खूपच स्पष्ट बोलतात. त्यांना स्पष्ट बोलण्याची सवय आहे,  उद्धव ठाकरे यांना राज्यातील प्रश्नांबाबत मी अनेकदा पत्रे लिहिली. पण त्यांनी माझ्या एकाही पत्राला उत्तर दिले नसल्याचेही त्यांनी सांगितलं.