भारतीय श्रीधान्य संशोधन केंद्रा मार्फत शेतीविषयक मार्गदर्शन.

1 min read

भारतीय श्रीधान्य संशोधन केंद्रा मार्फत शेतीविषयक मार्गदर्शन.

हुलसूर येथील कृषी वैज्ञानिक संगाप्पा बाबुराव चिल्लरग्गे यांनी केलं मार्गदर्शन.

हुलसूर/एम.एस.हुलसूरकर: हुलसूर येथील कृषी वैज्ञानिक संगाप्पा बाबुराव चिल्लरग्गे यांनी हुलसूर येथील श्री जय हनुमान मंदिर वार्ड क्र.१ मध्ये रात्री सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेऊन शेतामध्ये बारीक कडधान्य पौष्टिक आहार कशा पद्धतीने शेती करावी यासंदर्भात शेतक-यांशी संवाद साधत मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
शेतकरी अगोदर कावळी ज्वारी, भगर, राळे, असे पौष्टिक अन्न सेवन करीत होते. त्यामध्ये ताकद खूप होती, पण आता मात्र फास्ट फूड तेलकट पदार्थ चपाती, भात असे खाण्याने ताकद कमी होत चालली आहे. विविध आजाराला बळी पडत आहेत. त्यामुळे हुलसूर येथे श्रीधान्य संशोधन केंद्रा मार्फत येथील ३० शेतकऱ्यांना कावळी ज्वारी चे बियाणे देण्यात आले व त्याची कशा पद्धतीने लावणी करावी याचेही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते.