राज्य शासनाच्या स्थगिती आदेशाची भाजपने केली होळी.

1 min read

राज्य शासनाच्या स्थगिती आदेशाची भाजपने केली होळी.

स्थगिती आदेशाची होळी करत ठाकरे सरकारचा केला निषेध.

हिंगोली: केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून नव्याने पारित केलेल्या शेती विधेयकास राज्यशासनाने राज्यात लागू करण्यासंदर्भात स्थगिती आदेश दिला आहे. याचा निषेध करीत हिंगोली येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने गांधी चौक भागात स्थगिती आदेशाची होळी करण्यात आली.
देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कानुसार उत्पादित माल हवे त्या ठिकाणी विक्री करण्याची मुभा मिळावी, याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला भाव मिळावा. या अनुषंगाने केंद्र शासनाने शेती विधेयक पारित केले आहे. सदर विधेयकामुळे राज्यातील अनेक राजकीय लोकांची दुकाने बंद होणार आहेत. यामुळे ठाकरे सरकार सदर विधेयक राज्यात लागू करण्यास तयार नाही. असा आरोप करीत राज्य शासनाने विधेयकावर टाकलेली स्थगिती तात्काळ मागे घ्यावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने गांधी चौक भागांमध्ये स्थगिती आदेशाची होळी करण्यात आली.
WhatsApp-Image-2020-10-07-at-12.40.15-PM
यावेळी नगराध्यक्ष बाबाबराव बांगर, सरचिटणीस फुलाजी शिंदे, शहराध्यक्ष प्रंशात सोनी, मिंलीद यंबळ , तालुकध्यक्ष संतोष टेकाळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष उमेश नागरे, बंडु कराले, मनोज शर्मा, संजय ढोके, राजु पाटील , के.के.शिंदे, अमोल जाधव, यशोदा कोरडे, कृष्णताई रुहटीया, रजनी पाटील, संदीप वाकडे, क्रुष्णा ढोके, सुनिल जामकर, करण भन्साली, मंडले आदी उपसिथित होते.