अहमदपूरचे पाच तरूण विचित्र अपघातात ठार

1 min read

अहमदपूरचे पाच तरूण विचित्र अपघातात ठार

दुःखद बातमी - लातूर जिल्ह्याच्या वंजारवाडी या अहमदपूर तालुक्यातील गावातल्या पाच तरूणांचा विचित्र अपघातात मृत्यू झाला. हा अपघात पुणे खोपोली रस्त्यावरील घाटात ट्र्क पलटून झाला

अहमदपूर ताालुक्यातील पाच तरूण खोपोली भोर घाटात अगावर ट्रक पडून झालेल्या अपघातात ठार झाले. ही घटना १ मार्च रोजी मध्यरात्री घडली.
IMG_20200302_141419

लातूर जिल्ह्यच्या अहमदपूर तालुक्यातील वंजारवाडी या गावातील सहा तरूण पुण्याजवळच्या तळेगाव एमआयडीसी मध्ये काम करत होते.सुट्टीच्या दिवशी ते अलिबागला फिरायला गेले होते. अलिबागचा समुद्र किनारा फिरून झाल्यावर ते परतत असताना ही घटना घडली. सगळेच तरूण तीन मोटारसायकल गेऊन गेले होते. एमएच १४ सीव्ही ०२४३, एमएच १४ एफके ४०९७ एमएच१४ एफएच ५७९३ या गाड्या घेऊन ते परतत होते. खोपोली बोर घाटातील अंडा पऑईंटजवळ हे सगळेच गाड्या थांबवून लघूशंकेसाठ उतरले. याच वेळी पुण्याकडून खोपोलीकडे जाणारा आयशर ट्रक एमएच ४६ बीबी १८३० हा वेगात जात होता. घाटातील वळणावर हा ट्र्क पलटी होऊन रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोटारसायकल स्वारावर कोसळला आणि ट्रक खाली येऊन पाच जणांचा मृत्यू झाला. याच्यातील सहावा लघूशंकेसाठी जरासा बाजुला गेलेला असल्याने बचावला.

प्रदीप प्रकाश चोले,वय ३८ वर्षे नारायण राम गुंडाले, वय २८ वर्षे, गोविंद ज्ञानोबा नलवाड, अमोल बालाजी चिलमे वय ३० वर्षे आणि अर्जुन उर्फ निवृत्ती राम गुंडाले वय ३५ वर्षे ( सर्व रा. वंजारवाडी, ता.अहमदपूर जि.लातूर) या पाच जणांचा मृतात समावेश आहे. तर नशीबाने वाचलेल्या तरूणाचे नाव बालाजी हरिश्चंद्र भंडारे असे आहे. ही सगळी सध्या तळेगाव जवळ वराळे फाटा येथे राहत होती.