Airtel चा स्वस्त प्लॅन, 19 रुपयांत फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डेटाही

1 min read

Airtel चा स्वस्त प्लॅन, 19 रुपयांत फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डेटाही

टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांना कमी किंमतीत अधिक फायदा मिळावा यासाठी स्वस्त दरातील नवीन प्लॅन आणला आहे. अवघ्या 19 रुपयांचा नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन एअरटेलने आणला असून यामध्ये ग्राहकांना मोफत कॉलिंगचा फायदा मिळेल.

एअरटेलने आपला 19 रुपयांचा प्लॅन Truly Unlimited श्रेणीमध्ये ठेवले आहे, या श्रेणीमधील प्लॅनमध्ये अमर्यादित मोफत कॉलिंगचा फायदा ग्राहकाला मिळतो. अवघ्या दोन दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना इंटरनेट डेटाचाही फायदा मिळेल. दोन दिवसांसाठी ग्राहकांना या प्लॅनमध्ये 200MB डेटा मिळतो. एसएमएसची सुविधा ग्राहकांना या प्लॅनमध्ये मिळणार नाही.

याशिवाय, एअरटेलच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्येही ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. 28 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 2 जीबी डेटा आणि 300 एसएमएस मिळतात.