अजगराने गिळला टॉवेल, व्हिडिओ व्हायरल

1 min read

अजगराने गिळला टॉवेल, व्हिडिओ व्हायरल

, या १८ वर्षीय अजगराने समुद्रकिनारयावर ठेवलेला टॉवेल गिळंकृत केला होता,

असे व्हिडिओ बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे लोकांना चकित करतात. असाच एक व्हिडिओ आजकाल व्हायरल होत आहे, ज्यात डॉक्टर अजगराच्या पोटातून टॉवेल काढताना दिसत आहेत. व्हिडिओ ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचा आहे.

त्याचे झाले असे की, या १८ वर्षीय अजगराने समुद्रकिनारयावर ठेवलेला टॉवेल गिळंकृत केला होता, त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याच्या घशातून टॉवेल बाहेर काढला. डॉक्टर म्हणतात की, घटना घडताचक्षणी त्याला इथे आणल्यामुळे त्याचे प्राण वाचले. आता त्याची प्रकृती ठीक आहे.

ज्या पशुवैद्यकीय रुग्णालयात या अजगराच्या पोटातून टॉवेल बाहेर काढण्यात आला होता, त्यानेही घटनेचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे की, 'टॉवेल अजगराच्या पोटात खोलवर गेला होता. त्याच्या घशातून काढून टाकण्यासाठी एंडोस्कोपच्या मदतीने, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमधून टॉवेल काढले गेले. हे चांगले आहे की, टॉवेल सुरक्षितपणे काढून टाकला गेला आणि अजगरही बचावला.

यापूर्वी इंग्लंडमध्येही अशीच एक विचित्र घटना उघडकीस आली होती. येथील ब्रिस्टसमधील व्हेट्स पशुवैद्यकीय रुग्णालयात डॉक्टरांनी एका अशा माशाच्या पोटातून ट्यूमर काढले होते ज्याचे वजन अवघे एक ग्रॅम होते. या शस्त्रक्रियेमुळे हा मासा जगातील सर्वात छोटा शस्ञक्रिया करणारा मासा ठरला होता.

वृत्तानुसार, या छोट्या माशाची किंमत फक्त ८९ रुपये होती, परंतु त्याच्या ऑपरेशनसाठी सुमारे ९००० रुपये खर्च आला. ज्या रुग्णालयात या माशाचे ऑपरेशन होते त्या हॉस्पिटलमध्ये यापूर्वी गिरगिट, सरडा, साप आणि मगरी या प्राण्यांचीही शस्त्रक्रिया झाली होती.