अजित पवार हे डायनॅमिक नेते-चंद्रकांत पाटील

1 min read

अजित पवार हे डायनॅमिक नेते-चंद्रकांत पाटील

अजित पवार हे डायनॅमिक नेते आहेत, मराठा आरक्षणावर त्यांनी तोडगा काढावा: चंद्रकांत पाटील

RNO/कोल्हापूर: मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नव्हे तर मराठा समाजातील आंदोलनामुळे लावण्यात आल आहे. 144 कलम लावून आंदोलन दाबता येत नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी तातडीची कॅबिनेट बैठक घेवून 1500 कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा. अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी केली.
अजित पवार हे डायनॅमिक नेते आहेत, हा विषय त्याच्याकडे असल्यामुळे त्यांना माझी विनंती आहे त्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं.