अज्ञात वाहनाची धड़क;
दोघा तरुणांचा मृत्यु
लातूर - अंबाजोगाई रस्त्यावरील घटना

1 min read

अज्ञात वाहनाची धड़क; दोघा तरुणांचा मृत्यु लातूर - अंबाजोगाई रस्त्यावरील घटना

a

लातूर -अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील समसापूर पाटीजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटार सायकलवर स्वार दोघे तरुण जागीच ठार झाले. दोन्ही मयत रेणापूर तालुक्यातील सुमठाणा येथील रहिवाशी आहेत.

सुमठाणा येथील प्रताप संभाजी टेकाळे व रामभाऊ हनमंत भोसले हे दोघे मित्र राम भोसले यांच्या मालकीची मोटार सायकल (एमएच -२४ , एस ८९०९) घेऊन रेणापूरच्या आठवडी बाजारसाठी आले होते. बाजार करुन ते परत सुमठाणा गावाकडे रात्री नऊच्या दरम्यान जात असताना लातूर -अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर श्रीशैल्य मललीकार्जुन विद्यालय व समसापूर पाटीदरम्यान  लातूरहुन अंबाजोगाईकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मोटार सायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात गंभीररित्या जख्मी झालेल्या प्रताप टेकाळे व रामभाऊ भोसले जागीच मृत्यु पावले. सदर अपघातानन्तर कांही वाहने त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांच्या डोक्यांचा चेंदामेंदा झाला.

सदर घटनेची माहिती मिळताच रेणापूरचे एपीआय माचेवाड, पोकॉ. बी. आर. कन्हेरे, गौतम कांबळे, कृष्णा शेळके, चालक सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्यावर पडलेल्या प्रेतांचे तुकडे जमा करुन रेणापूरच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवुन दिले.