अजून एक गँगरेप..सावधान जनावरे जिवंत आहेत.
निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी दिल्यानंतर जरा हायसे वाटत असतानाच माणसातील जनावरांचा विषाणु जिवंत असल्याची खात्री पटणारी घटना झारखंड मध्ये घडली आहे. करोनामुळे संचारबंदी चालू असल्याचे निमित्त करत आडवळणाच्या रस्त्याला घेऊन जाऊ तरूणीवर आठ जणांनी अत्याचार केला आणि तिला बेशुध्द अवस्थेत जंगलात सोडून दिले.
झारखंड मधील दुमका जिल्ह्यातील ही घटना आहे. ही घटना मुफसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्यापिठ रोडवर घडली. या भागातील आदिवासी समाजाची एक १६ वर्षाची मुलगी शहरात शिक्षणासाठी जात असते. कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे तिचे कॉंलेज बंद झाले असल्याने ती आपल्या गावी परतली होती. याच काळात ती आपल्या मैत्रिणिला भेटण्यासाठी स्कुटीवर गेली होती. परतत असताना. युनिव्हर्सीटी रोडवर तरूणांचे टोळके उभे होते. समोर पोलीस तपासणी चालू आहे. ते जाऊ देत नाहीत आपण आडवळणाच्या रस्त्याने जाऊ असा सल्ला त्यांनी तिला दिला. सात आठ तरूण आणि तीव चार गाड्या असल्याने तिने देखील विश्वास ठेवला. आणि मधल्या मार्गाने ती या मुलांच्या सोबत निघाली.
आडवळणाच्या रस्त्याने मुख्य रस्त्यापासून खुप दूर गेल्यावर त्यांनी डाव साधला. आणि गाडीवरील आठ ते नउ नराधमांनी तिच्यावर अमानुष अत्याचार केले. यात तिच्या गावातील एक ओळखीचा एक तरूण देखील होता. त्यानेच तिला आडवळणाच्या रस्त्याचा सल्ला दिला होता. हे आठ जण तिच्यावर रात्री उशीरापर्यंत आळीपाळीने अत्याचार करत होते. यामुळे ती जंगलात बेशुध्द पडली. तिला त्याच अवस्थेत सोडून सगळे नराधम पसार झाले.
रात्रभर जंगलात बेशुध्द अवस्थेत राहिल्यानंतर तिला सकाळी शुध्द आली. आणि ती कशीबशी रांगत रांगत मुख्य रस्त्यावर आली. तिला या स्थितीत लोकांनी बघितले आणि दवाखाण्यात दाखल केले. त्यानंतर हे प्रकरण समोर आले.
दुमकाचे पोलीस अधिक्ष मयुर पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीतेचे जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. यातील सोळा आरोपीना पकडण्यात यश आले आहे.