पूरग्रस्त कुटुंबांना अक्का फाउंडेशनचा मदतीचा हात...!

1 min read

पूरग्रस्त कुटुंबांना अक्का फाउंडेशनचा मदतीचा हात...!

अक्का फांऊडेशनच्या माध्यमातुन जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्य किटचे वाटप

निलंगा : देवणी-वडमुरंबी येथे अतिवृष्टीमुळे नाल्याचे पाणी घरात घुसून दिलीप  बिरादार, गुणवंतजी बिरादार, बाबुराव भिंगे यांच्या परिवाराचे मोठे नुकसान झाले होते. पाणी घरात शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तुची नासाडी झाली होती. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर हे वडमुरंबी येथे आले असताना सदर कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनास आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे आता या तिन्ही कुटुंबांना अक्का फांऊडेशनच्या माध्यमातुन जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.

त्याप्रसंगी अक्का फांऊडेशनचे समन्वयक रामलिंग शेरे, शिवराज बिरादार, माजी तालुका अध्यक्ष भाजयुमो प्रशात पाटील, उपाध्यक्ष भाजयुमो बालाजीजी बिरादार, संगमेश्वर बिरादार, महेश बिरादार, ईश्वर स्वामी, श्यामभाऊ बिरादार पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.