अकोला मध्यवर्ती कारागृहातील 50 कैद्यांना कोरोनांची लागण

1 min read

अकोला मध्यवर्ती कारागृहातील 50 कैद्यांना कोरोनांची लागण

आता पर्यंत 68 कैद्यांना कोरोनाची लागण, इतर 300 कैद्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका.

अकोलाः अकोला मध्यवर्ती कारागृहातील दि. 28 जून रोजी 50 कैद्यांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले असून संपुर्ण कारागृह कोरोनाच्या विळख्यात आहे. 300 कैद्यांना कोरोना होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. कारागृहातील 18 कैद्यांना 23 जून कोरोना झाला होता. त्यांच्या संपर्कातील 50 कैद्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आता या 50 कैद्यांच्या संपर्कातील 300 कैद्यांना कोरोना होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अकोला कारागृहात 400 कैद्या आहे. हे कारागृह लवकरच कोरोना कारागृह बनेन अशी भिती व्यक्त केल्या जात आहे.

कारागृहातील प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडून मागील तीन महिन्यांपासून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न सुरु होते, मात्र मंगळवारी रात्री कारागृहातील सुमारे 18 कैद्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर रविवारी तब्बल 50 कैद्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे समोर येताच प्रशासनाला धक्का बसला. 5 दिवसात सुमारे 68 कैदी कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने आता कारागृहातील 400 कैदीही धोक्यात सापडले आहेत. आतापर्यंत शहराच्या विविध भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढतीच होती. मात्र आता कारागृहातही कोरोनाने मोठी शिरकाव केल्यामुळे कारागृह प्रशासनावर मोठे संकट आले आहे. एका बरॅकमधील तब्बल 18 कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता विविध बरॅकमधील तब्बल 50 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 68 कैद्यांचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याने प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला. त्यामुळे संपुर्ण कारागृहच आता कोरोनाच्या विळख्यात सापडण्याची भिती व्यक्त केल्या जात आहे.