बाबरी विद्ध्वंस प्रकरणात अडवाणींसह सर्व आरोपी निर्दोष.

1 min read

बाबरी विद्ध्वंस प्रकरणात अडवाणींसह सर्व आरोपी निर्दोष.

6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत घडलेल्या विद्ध्वंसप्रकरणी कोर्टाने तब्बल २८ वर्षाने निर्णय दिला आहे. बाबरी विद्ध्वंस ही घटना पूर्वनियोजित नव्हती, ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.

नवी दिल्ली : भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणात सीबीआयच्या (CBI) विशेष कोर्टाने निर्दोष मुक्त केले. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत घडलेल्या विद्ध्वंसप्रकरणी कोर्टाने तब्बल २८ वर्षाने निर्णय दिला आहे. बाबरी विद्ध्वंस ही घटना पूर्वनियोजित नव्हती, ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे कोर्टाने नमूद केले आहे.

बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणात सीबीआयच्या (CBI) विशेष कोर्टाने निकालाल नमूद केले आहे की, या मोठ्या राजकीय नेत्यांनी ही हिंसा रोखण्याचाही प्रयत्न केला होता. या घटनेबाबत कोणताही पुरावा नाही. “विहिप नेते अशोक सिंघल यांच्याविरुद्ध पुरावा नाही. फोटो, व्हिडीओ, फोटोकॉपीमध्ये ज्या पद्धतीने पुरावे देण्यात आले आहेत, त्यावरुन काहीही सिद्ध होत नाही”, असेही न्यायाधीश एस.के. यादव यांनी सांगितले.

बाबरी खटल्यावर सीबीआय(CBI) चे विशेष न्यायालयाने आज (बुधवारी 30 सप्टेंबर) निकाल दिला. या खटल्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, कल्याण सिंह यांसारख्या मोठ्या राजकीय व्यक्तींसह एकूण 32 जण आरोपी होते. लखनौमधील कोर्टात सकाळी 11 वाजता या निकाल वाचनाला सुरुवात झाली. जवळपास दीड तासांनी म्हणजे 12.30 वाजता या घटनेचा निकाल आला. या निकालाकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले होते.