जलजागृती सप्ताहात सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवावा-सीईओ टाकसाळे

२२ मार्च ते २७ मार्च या कालावधीत कॅच द रेन या उपक्रमांतर्गत जलजागृती सप्ताहाचे आयोजन

जलजागृती सप्ताहात सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवावा-सीईओ टाकसाळे

परभणी : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने आयोजित जलजागृती सप्ताहामध्ये परभणी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीने सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे.

आज जागतिक जल दिनानिमित्त परभणी येथील जि. प. सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या उपस्थितीत जि. प. मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जलशपथ देण्यात आली. २२ मार्च ते २७ मार्च या कालावधीत कॅच द रेन या उपक्रमांतर्गत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये पाण्याचे स्रोत बळकटीकरण करणे, भूजल पुनर्भरण करणे, ग्रामस्थांना जल शपथ देणे, जलस्त्रोतांचे पुनर्जीवन करणे, सांडपाणी व्यवस्थापन पुनर्भरण व पुनर्वापर करणे असे विविध उपक्रम या कालावधीत राबविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी जलजागृती सप्ताह उत्साहात राबविण्याबाबत जिल्हास्तरावरून सूचित केले आहे. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर यंबडवार, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, एमआरइजीएस चे गट विकास अधिकारी जयंत गाढे आदींची उपस्थिती होती


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.