माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे-खा.संजय जाधव

जमीन व्यवहार प्रकरण ; समाज माध्यमांवरील आरोपांना खासदारांचे प्रत्युत्तर

माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे-खा.संजय जाधव

विजय कुलकर्णी /परभणी : शहराजवळील शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांची जमीन विकत घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी समाजमाध्यमांवर शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर गुरुवार दि.१४ रोजी जाधव यांनी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडण केले आहे. माझ्यावर केलेले सर्व आरोप हे धादांत खोटे असून जमिनीचा व्यवहार हा रितसर झाल्याचे यावेळी ते म्हणाले.

परभणी शहरालगत असलेल्या झिरोफाटा येथे शिवसेनेचे दिवंगत कार्यकर्ते स्वप्नील काळे यांची जमीन आहे. यातील चार एकर जमीन विद्यमान खासदार जाधव यांनी स्वप्नीलचे वडील प्रा.रामप्रसाद काळे यांच्याकडून ४४ लाख ५३ हजार रुपयांमध्ये त्यांच्या पत्नी क्रांती जाधव यांच्या नावे खरेदी केली. परंतु यानंतर स्वप्नील काळे यांची आई प्रेमा काळे, स्वप्नील काळेंच्या पत्नी आणि बहिणींनी ही जमीन आम्हा कुटुंबियांना विश्वासात न घेता खरेदी केलेली असून आता ही जमीन रिकामी करण्यासाठी धमकी येत असल्याचे समाजमाध्यमातुन सांगितले होते. दोन दिवस समाजमाध्यमात याची राळ ऊडाल्यानंतर अखेर खा.जाधव यांनी पत्रकार परीषद घेऊन या आरोपांचे खंडण केले आहे.

यावेळी पुढे बोलताना खासदार म्हणाले की, या जमिनीचे खरेदीखत हे रितसर झालेले असुन यामध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. रितसर या जमिनीचे पैसे प्रा.रामप्रसाद काळे यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत. परंतु आता माझ्यावर राजकीय वैमनस्यातुन ऊलट सुलट आरोप केले जात आहेत. याला राष्ट्रवादीचे आ.बाबाजानी दुर्राणी यांचे पाठबळ असल्याचेही ते म्हणाले. याऊलट यांचा व्यवहारही चोख असून काळे यांच्या घरातही जमिनीची फोड झालेली आहे. खरेदी केलेली जमीन ही प्रा.रामप्रसाद काळे यांच्या नावाची होती ती खरेदी केलेली आहे. त्यामुळे कुटुंबियांना यामध्ये हरकत घेण्यात काहीच अर्थ नाही. परंतु माझ्यावर याबाबत निष्कारण आरोप केले जात असुन यामध्ये कोणतेही तथ्य नाही. जमीन ज्यांनी विक्री केली व पैसे घेतले त्यांना उस्मानाबाद येथील जावयाकडे पाठवुन दिले असून त्यांना समोर न आणता कुटुंबियच हे आरोप करत आहेत. मी जमीन बळकावणारा किंवा लुबाडणारा नाही. राजरोस हा व्यवहार झालेला असल्याचे खासदारांनी यावेळी सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.