नाथसागराचे सर्व दरवाजे उघडले, गोदावरीत पाण्याचा विसर्ग

धरणात ९८.६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

नाथसागराचे सर्व दरवाजे उघडले, गोदावरीत पाण्याचा विसर्ग

औरंगाबाद : नगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेला नाथसागर (जायकवाडी) तुडुंब भरला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी या धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आली. रात्री पाणलोटक्षेत्रात पाण्याची मोठी आवक सुरु झाल्यामुळे नाथसागराचे एकुण सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. रात्री अकरा वाजता धरण प्रशासनाने हा निर्णय घेतला. धरणात ९८.६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

गाेदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. धरण भरल्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार हेक्टर सिंचनाला फायदा होणार आहे. मंगळवारी जायकवाडीत उपयुक्त जलसाठा १८४६ दलघमी ८५.०४% होता, तर बुधवारी रात्री ताे ९८.६२ टक्क्यांवर (२,१३६ दलघमी) पाेहाेचला. ३६ तासांत २९० दलघमी (१३%) पाणी वाढले. सकाळी ११ वाजता तर ९४ टक्क्यांपर्यंत जलसाठा पाेहाेचला. त्यामुळे तातडीने दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी १५ अाॅगस्ट २०१९ राेजी व ४ सप्टेंबर २०२० राेजी धरणाचे दरवाजे उघडले हाेते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.