'सत्ता टिकवणं ही तिनही पक्षांची गरज'-संजय राऊत

अडीच वर्षांच्या मु्ख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी दावा करेल आणि आघाडी मध्ये बिघाडी येईल असं म्हंटलं जात होत. त्यावरच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनामधुन स्पष्ट उत्तर दिलं आहे.

'सत्ता टिकवणं ही तिनही पक्षांची गरज'-संजय राऊत

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंत तापलेलं दिसतं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी देखिल पंतप्रधानांची भेट घेतली परंतु त्यानंतर ठाकरे-मोदी यांची वैयक्तिक चर्चाही केली. त्यामुळे आघाडी सरकार पडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. 'अडीच वर्षांच्या मु्ख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी दावा करेल आणि आघाडी मध्ये बिघाडी येईल,' असं म्हंटलं जात होत. त्यावरच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनामधुन स्पष्ट उत्तर दिलं आहे.

"अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा दावा करेल, त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडेल. त्या वादातुन राज्यात नव्या राजकीय घडामोडींना वेग येईल. असं जे पसरवलं जात आहे. त्यात काही तथ्य नाही. शिवसेनेकडे असलेले मुख्यमंत्री पद हा पाच वर्षांसाठी दिलेला शब्द आहे." असं म्हणत मुख्यमंत्री पद शिवसेनेकडेच राहील हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

'महाराष्ट्र सरकार चालवणे व टिकवणे ही आघाडीतील तिनही पक्षांची गरज आहे. मी मजबुरी शब्द मुद्दाम वापरत नाही. देशातील अनेक राज्यांत भाजपची सत्ता आहे. पण महाराष्ट्रासारखे राज्य नसेल तर काही करमत नाही. काँग्रेसकडे इतर एक-दोन राज्ये आहेत, परंतु महाराष्ट्राच्या सत्तेचा ते एक महत्त्वाचा भाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसदेखिल महाराष्ट्राबाहेर विस्तारली नाही, तसंच हिंदुत्वाचा सर्वात मोठा ब्रँड असूनही शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर झेप घेता आली नाही,' अशा वेळी महाराष्ट्रातील सत्ता टिकवणे हे तिनही पक्षांसाठी गरजेचे आहे, असं ते म्हणाले.

"सगळे बरे चाललेले असताना बसलेली घडी विस्कटण्याचा कोण प्रयत्न करेल? दिल्लीच्या धावत्या भटीचे कवित्व हे फक्त बुडबुडेच आहेत. ठाकरे-मोदी भेट ही वर्तमानापेक्षा भविष्याचा वेध घेणारी ठरो," अशा शब्दांत त्यांनी भाजपवर देखिल टिका केली आहे.  


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.