देशमुखांवरील आरोप गंभीर, राजीनाम्यावर उद्यापर्यंत निर्णय घेऊ- शरद पवार

उद्या चर्चा करू आणि गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ

देशमुखांवरील आरोप गंभीर, राजीनाम्यावर उद्यापर्यंत निर्णय घेऊ- शरद पवार

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपये महिन्याला मागितल्याचे गंभीर आरोप केल्यानंतर विरोधकांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिय देत मुख्यमंत्र्यांशी यावर उद्या चर्चा करू आणि गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ असे पवारांनी स्पष्ट केले

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण विरोधकांना यात यश येणार नाही, परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिल्या पत्रावर त्यांची स्वाक्षरी नाहीए. तसंच १०० कोटींच्या वसुलीचे पैसे कुणाकडे गेले? याचा उल्लेख नाही, असे पवार म्हणाले.

**गृहमंत्र्यांची बाजु ऐकून घ्यावी लागेल **

गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही बाजू ऐकून घ्यावी लागेल. याबाबत सर्व नेत्यांशी बोलून निर्णय घेऊ, गृहमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंग हे मला भेटले होते. त्यावेळी त्यांनी अन्याय होत आहे, असे सांगितले होते


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.