पोलिसांवरील आरोप खरा की खोटा, सीसीटीव्हीमुळे ट्विस्ट

औरंगाबादेत पोलिस मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.

पोलिसांवरील आरोप खरा की खोटा, सीसीटीव्हीमुळे ट्विस्ट

औरंगाबादः औरंगाबाद येथील उस्मानपुऱ्यात पोलिसांच्या मारहाणीत सलून व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत काल उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. मात्र या घटनेला वेगळेच वढण आल्याचे दिसते.परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे आता वेगळेच ट्विस्ट निर्माण झाला आहे.

सलून व्यावसायिकाचा पोलिसांनी मारहाण केल्याने मृत्यू झाला असा आरोप काल पोलिसांनवर लावण्यात आला होता. आज परिसरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये सलून चालक पोलिसांशी बोलत असतानाच अचानक जमिनीवर कोसळल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केली की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणी औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकासह एका कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली केली आहे.

फिरोज खान यांना मारहाण केल्याचा आरोप

सलून उघडल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन पोलीस कर्मचारी सलूनवर पोहोचले. पोलिसांनी खान यांना बेदम मारहाण केल्याचा दावा केला जात होता. या मारहाणीत सलून व्यावसायिक फिरोज खान यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता.

दरम्यान, समोर आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलीस बोलत असताना सलून चालक अचानक जमिनीवर कोसळल्याचे दिसत आहे. त्यांना परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात हलवल्याचंही फूटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी सलून चालकाला मारहाण केली की नाही, असा संभ्रम आता निर्माण होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.