आरोप दुर्दैवी, सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करावे- संजय राऊत

गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पत्राची सत्यता तपासून पाहण्याची मागणी केली आहे.

आरोप दुर्दैवी, सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करावे- संजय राऊत

नाशिकः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका पत्राद्वारे गंभीर आरोप केले आहेत. या सर्व घडामोडींवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोप दुर्दैवी, सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करावे संजय राऊतांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे स्फोटक पत्र समोर आल्याने राजकीय वर्तुळात तसेच महाराष्ट्र पोलीस दलात भूकंप झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या या पत्रात परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केले. देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. परमबीर सिंह हे माजी पोलीस आयुक्त होते. ते एक उत्तम अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत उत्तम सेवा बजावली आहे. या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार योग्य ती भूमिका घेतील. त्या पत्रात किती सत्यता आहे हे ते तपासून पाहतील. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पत्राची सत्यता तपासून पाहण्याची मागणी केली आहे. तसेच, अशाप्रकारचे आरोप होणे हे नक्कीच दुर्देव आहे. ज्यांनी हे सरकार यावे म्हणून खारीचा वाटा उचलला अशा आमच्या हितचिंतकांसाठी धक्कादायक आहे, असे राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊतांचं ट्वीट चर्चेत; रोख नेमका कोणाकडे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोष्टी घडल्या. या सगळ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जगभरात सत्तास्थानी बसल्यावर अनेकांना आपण शहाणे असल्याचे वाटायला लागते, हे या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आले, असेही त्यांनी म्हटले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.