पिककर्ज वाटप करा! अन्यथा आंदोलनास सामोरे या.

1 min read

पिककर्ज वाटप करा! अन्यथा आंदोलनास सामोरे या.

युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार-रामेश्वर मोकाशे

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: पेरण्या होऊन तब्बल दोन महिने उलटूनही बँकांनी कर्ज वाटप करण्यास विलंब लावला आहे. एकीकडे यावर्षी सोयाबीन व मूग या पिकाची दोन ते तीन वेळा पेरणी केल्यानंतर पिके उगवली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सोसावा लागला आहे. या सर्व संकटाची बाब लक्षात घेता राज्य शासनाने शेतकऱ्यांना वेळेत कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिले असून यानुसार बँकांनी कर्ज देण्याची प्रक्रिया चालवली आहे. मात्र संथ या पद्धतीने कर्ज वाटप करण्यात येत असून शेतकऱ्यांना ३१ ऑगस्ट चा अखेरपर्यंत कर्ज वाटप करा. अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी एका निवेदनाद्वारे तालुका निबंधक यांच्याकडे मागणी केली आहे. निवेदनात त्यांनी कर्जमाफी विषयी गावपातळीवर जाऊन शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या आधार प्रामाणिकरणच्या त्रुटी सोडवण्याची मागणीही केली आहे.

युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे