MPSC परीक्षार्थींना विशेष प्रवासाची परवानगी द्या : सत्यजित तांबे

MPSC परीक्षा घेण्याच्या निर्णयाचे स्वागत

MPSC परीक्षार्थींना विशेष प्रवासाची परवानगी द्या : सत्यजित तांबे

मुंबई : MPSC ची रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलल्याने राज्यातील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यानंतर राज्यसेवा आयोगाने आज सकाळी परीपत्रक काढुन नवीन परीक्षची तारखी जाहीर करण्यात आली आहे. आता ही परीक्षा २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. यावर महाराष्ट्र युवक काॅग्रसेचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी निर्णयाचे स्वागत केलं आहे.

सत्यजित तांबे यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, २१ मार्चला MPSC परीक्षा घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सर्वप्रकारच्या सरकारी भरतींच्या बाबतीत एक सुनियोजित धोरण व पारदर्शक प्रक्रिया जाहीर करुन संभ्रमावस्था दूर करावी. २१ मार्चच्या परीक्षेला लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यातील परीक्षार्थींना विशेष प्रवासाची परवानगी देण्यात यावी. असं युवक काॅग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.