शहराच्या विकासासाठी सदैव राठोड यांच्या पाठीशी-राजेश विटेकर

1 min read

शहराच्या विकासासाठी सदैव राठोड यांच्या पाठीशी-राजेश विटेकर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

सिद्धेश्वर गिरी/सोनपेठ: सोनपेठ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांना सदैव सहकार्य करून शहराचा विकास करण्यासाठी पाठीशी राहणार असल्याचा पुनरुच्चार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांनी केला आहे. सोनपेठमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
पाथरी नगरपालिकेनंतर सोनपेठ नगरपालिकेच्या विकासाला गती मिळाली आहे.सोनपेठ शहरातील नागरिकांच्या विश्वासाला राठोड पात्र झाले आहेत. शहराचा विकास हेच त्यांचे ध्येय आहे. हे ध्येय पूर्ण होण्यासाठी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राठोड जी कोणती भूमिका घेतात ती योग्यच असते, असे सांगत त्यांनी खोटी माहीती देऊन विकासनिधीची अडवणूक करणाऱ्यानी विकासासाठी सर्व भेदभाव दूर करावेत आणि सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष तथा गटनेते चंद्रकांत राठोड यांनी विटेकर यांचे नेहमी सहकार्य मिळत असतेच. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सोनपेठ शहरातील या सभांडपाला गती प्राप्त झाली असून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विटेकर यांचे आभार मानले
तसेच येत्या चार महिन्यात सदर सभामंडपाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच शहरातील नागरिकांना पक्के घर देण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने ज्यांच्याकडे जागा नाही, मात्र ते वीस वर्षांपासून त्या जागेत राहतात. त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असून २०२१ पर्यंत कोणीही पक्क्या घरापासून वंचित राहणार असल्याचा मनोदय राठोड यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीकांत देशमुख, माजी नगरसेवक मारोती रंजवे,प्रा.भास्कर तिरमले यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष दत्तराव कदम,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दशरथ सूर्यवंशी,युवा नगरसेवक ॲड.श्रीकांत विटेकर,निलेश राठोड,रमाकांत राठोड,माजी उपनगराध्यक्ष सुहास काळे,दिगंबर भांडुळे, नगरसेवक अमृत स्वामी,सुनील बर्वे,लक्ष्मण खरात,विनोद चिमनगुंडे,डाँ.श्रीनिवास गुळभिले,शेख युनूस,नजीर राज,बालासाहेब घुगे,कृष्णा कुसूमकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन तिरमले यांनी केले.