अंबाजोगाई-लातूर बसचा भीषण अपघात,चालकाचा मृत्यू

रेणापुर पिंपळफाट्याजवळ अंबाजोगाई-लातूर या बसचा भीषण अपघात, आठ ते नऊ जण गंभीर, दोघांची प्रकृती चिंताजनक

अंबाजोगाई-लातूर बसचा भीषण अपघात,चालकाचा मृत्यू

माधव पिटले/लातूर: रेणापुर पिंपळफाट्याजवळ अंबाजोगाई-लातूर या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात आठ ते नऊ जण गंभीर तर बस चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमीना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अंबाजोगाई येथून लातूरकडे निघालेल्या लातूर डेपोच्या बस क्रमांक एम.एच 20 बी.एल 1053 या बसच्या चालकाने रेणापुर पिंपळफाटा जवळ मेन रोडवर उभा राहिलेल्या व विटाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली . अपघात इतका भीषण होता की, जवळपास अर्धी बस पूर्णपणे चिरली असून अनेक प्रवासी अडकून पडले होते. या दुर्घटनेत आठ ते नऊ लोकांना शासकीय रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ड्रायव्हर च्या बाजूने जबर धडक दिल्याने चालक अडकून पडला होता. अशी माहिती घटनास्थळी असलेल्या लोकांनी दिली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.