अमेरिकेचा चीनला झटका, 45 दिवसांत टिकटॉक-विचॅट चा कारभार गुंडाळा.

1 min read

अमेरिकेचा चीनला झटका, 45 दिवसांत टिकटॉक-विचॅट चा कारभार गुंडाळा.

टिकटॉक-विचॅट अँप अमेरिकेमध्ये बंद करण्याचा आदेश

Analyser Team
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री उशिरा चीनच्या मालकीच्या टिकटॉक आणि मेसेजिंग अॅप विचॅटच्या बंदी विरोधातील दोन कार्यकारी आदेशांवर स्वाक्षर्‍या करून राष्ट्रीय सुरक्षेची चिंता व्यक्त करत. टिकटॉक-वेचॅट अँप अमेरिकेमध्ये बंद करण्याचा आदेश दिला आहे. 45 दिवसांच्या आत टिकटॉक-विचॅट यांनी आपला कारभार गुंडाळावा. तसेच कोणतीही अमेरिकन कंपनी किंवा व्यक्तीला चिनी मूळ कंपनी किंवा वेचॅट बरोबर व्यवहार करण्यास मनाई केली आहे.

अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

या कंपन्या अमेरिकेत अँपलच्या अ‍ॅप स्टोअर किंवा गुगलच्या प्ले स्टोअरवर दिसणार नाहीत. या आदेशामुळे अमेरिका आणि चीनचे संबंधात तणाव वाढल्याचे दिसत आहेत. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत तेव्हा हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याची धमकी दिली होती.