अमिताभ बच्चनची नात उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर भडकली

कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हव, मी रिप्‍ड जीन्स अभिमानाने घालनार

अमिताभ बच्चनची नात उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर भडकली

मुबंईः उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्य़मंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलाच्या कपड्यांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले. रिप्‍ड जीन्स संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यात अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. नव्या नंदाने आपल्या इंस्‍टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हवी.

तीरथ सिंह रावत यांनी महिलाच्या कपड्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? महिलेच्या गुडघ्यावर फाटलेली जीन्स पाहून मनात प्रश्न येतो की यामुळे समाजात काय संदेश जाईल, मुलांवर कसे संस्कार होतात, हे सर्वस्वी पालकांवर असतं, असे तीरथ सिंह यांनी म्हटले आहे. तीरथ सिंह रावत म्हणाले की, ''मी जयपूरला एका कार्यक्रमासाठी जात होतो. जहाजातून प्रवास करत असताना तिथे एक महिला आपल्या २ मुलांसोबत होती आणि तिने गुडघ्यावर फाटलेली जीन्स घातली होती. मी जेव्हा तिला विचारले की तुम्हाला कुठे जायचे आहे? तेव्हा त्या महिलेने सांगितले की मी दिल्लीला जात आहे. मी एक स्वयंसेवी संस्था चालवते, असे तीने मला सांगितले, असे तीरथ सिंह रावत म्हणाले .रावत म्हणाले की, तेव्हा मी विचार केला की, जर स्वयंसेवी संस्थाचालवणारी महिला असे कपडे परिधान करत असेल, तर ती समाजाला कशाप्रकारे संस्कार घडवेल? आम्ही शाळेत होतो, तेव्हा असे कधीच नसायचे, असेही तीरथ सिंह यांनी म्हटले.

तीरथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्या मुळे अनेक प्रतिकिया येत आहेत . यात अभिनेता अमिताब बच्चन यांची नाथ इने देखिल स्‍क्रीनशॉट शेअर करत लिहिले आहे की, WTF, आमचे कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हवी. तिने म्हटले आहे की, मी अभिमानाने रिप्ड जीन्स घालणार आहे. तिने पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री आम्हाला चांगले वातावरण देऊ शकतात का? एक फोटो शेअर करत तिने म्हटले आहे की, मी माझी रिप्‍ड जीन्स घलिन धन्यवाद. आणि मी या जीन्सला अभिमानाने घालणार, असेही तिने म्हटलेय आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.