पंधराव्या वित्त आयोगातून दिड कोटी रुपयांची रक्कम ग्रामपंचायतीकडे वर्ग.

1 min read

पंधराव्या वित्त आयोगातून दिड कोटी रुपयांची रक्कम ग्रामपंचायतीकडे वर्ग.

प्रारुप आराखड्यानुसार कामे होणार?

सिद्धेश्वर गिरी/ सोनपेठ: कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या निवडणूका लांबणीवर पडलेल्या असतानाच तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतवर शासकीय कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून निवड करण्यात आल्याने गावपातळीवरील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र या वातावरणावर विरजण पडण्याची शक्यता नुकतीच दिसून येत आहे.
तालुक्यात एकूण ४२ ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांसाठी शासनाच्या वतीने १ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी सोनपेठ तालुक्याला प्राप्त झाला आहे. त्याचे वितरणही प्रत्येक ग्रामपंचायतीच्या खात्यावर करण्यात आल्याची माहिती सोनपेठचे गटविकास अधिकरी सचिन खुडे यांनी दिली.
तालुक्यात एकूण ३३ ग्रामपंचायतीचे कारभारीपद हे शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या संधीचे सोने करण्याची उमेद या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनात असली तरी त्यांच्यावर जुन्या सरपंचांनी केलेल्या प्रारुप आराखड्याचे बंधन राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तालुक्यातील एकूण 42 ग्रामपंचायतींना १ कोटी ४१ लाख ५१हजार ६५३ रुपयाचे वितरण झाले असून. यात केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या निधीमधून ५०% बधित निधी म्हणून राखीव ठेवला आहे.
राज्य शासनाने व परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यातुन करण्यात येणाऱ्या कामासाठी जनहितार्थ निर्णय घेतले असून. या निर्णयामुळे गावपातळीवर असणाऱ्या काही पांढऱ्या कपड्यातील खाऊ वृत्तीच्या लोकांची पोटदु:खी झाली आहे. तरीही जुन्या सरपंचानी आखून दिलेल्या आराखड्याप्रमाणे कामे करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
काय म्हणतो शासन निर्णय.
राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, सदर रक्कमेतून ५० टक्के बधित रक्कम म्हणून ठेवत. गावपातळीवर असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची कामे करण्यासाठी हा निधी वापरत जल जीवन मिशनअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून कार्यात्मक घरगुती नळ जोडणी कामे करण्यासाठी बधित निधी वापरण्याचे नमूद करण्यात आले आहे. तर परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीस पंधराव्या वित्त आयोगाच्या बंधित आणि अबंधीत निधीमधून बाहेर गावाहून येणाऱ्यासाठी थर्मल स्कनिंग मशीन, गावपातळीवरील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी इंटरनेट सुविधा, साहित्य खरेदी, स्मशानभूमीच्या संरक्षक भिंत, यासह कोरोना पार्श्वभूमीवर उद्भभवणार्‍या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचेही नमूद करण्यात आले आहे.