अनंत भालेराव पुरस्कार अहमद कुरेशी यांना प्रदान

1 min read

अनंत भालेराव पुरस्कार अहमद कुरेशी यांना प्रदान

झुंझार पत्रकार, स्वातंत्र्य सेनानी अनंत भालेराव यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा, २०२० सालचा पुरस्कार हिमरू तज्ज्ञ अहमद सईद कुरेशी यांना प्रदान करण्यात आला.

औरंगाबाद : झुंझार पत्रकार, स्वातंत्र्य सेनानी अनंत भालेराव यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा, २०२० सालचा पुरस्कार हिमरू तज्ज्ञ अहमद सईद कुरेशी यांना प्रदान करण्यात आला.
अनंत भालेराव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी अनंत भालेराव यांच्या स्मृती दिनाचे (२६ ऑक्टोबर) औचित्य साधून हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतो.
यावर्षी कोरोना आपत्तीच्या पार्श्वभुमीवर कार्यक्रम अतिशय मोजक्या लोकांमध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तावीक सचिव डाॅ. सविता पानट यांनी केले. २०१९ हे अनंतरावांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने औरंगाबाद खेरीज सेलु, परभणी, माजलगांव, अंबाजोगाई येथे व्याख्याने घेण्यात आली. मराठवाड्यात सर्वदूर कार्यक्रम घेण्याचे नियोजन होते. पण कोरोना आपत्ती मुळे ते स्थगीत ठेवण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना अहमद कुरेशी यांच्या वतीने त्यांचे पुत्र आणि शिष्य इमरान कुरेशी यांनी भावना व्यक्त केल्या. ७०० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेली ही कला जपून ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी डावीकडून प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डाॅ. प्रभाकर पानट, सचिव डाॅ.सविता पानट, सत्कारमुर्ती अहमद सईद कुरेशी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर अण्णा मुळे, मानपत्राचे वाचन, सुत्रसंचालन व आभार श्रीकांत उमरीकर यांनी मानले