वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल.

1 min read

वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल.

कोरोनाच्या अनुषंगाने लॉक डाऊनच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात असताना, जमाव जमवून मास्क न घालता सोशल डिस्टंसिंग चे पालन न केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य लोकांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RNO/पंढरपूर: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेली पाच महिने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद होते. हे मंदिर भाविकांसाठी खुले करावे. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेना, बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपुरात आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या अनुषंगाने लॉक डाऊनच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात असताना, जमाव जमवून मास्क न घालता सोशल डिस्टंसिंग चे पालन न केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, विश्व वारकरी सेनेचे अरुण महाराज बुरघाटे यांच्यासह अन्य लोकांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
WhatsApp-Image-2020-09-01-at-2.00.53-PM
यावेळी अँड. प्रकाश आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे, गणेश महाराज शेटे, धनंजय वंजारी, आशोक सोनोने, रेखा ठाकूर, आनंद चंदनशिवे, सागर गायकवाड, रवी सर्वगोड, माऊली हळनवार यांच्यासह अन्य ११ ते १२ लोकांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन न केल्याप्रकरणी त्यांच्यावर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गायकवाड करत आहेत. अशी माहिती पोलिस उपअधिक्षक सागर कवडे यांनी दिली.