अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी संप

हुलसुर तालुक्यातील अंगणवाडी आणि अक्षरदसोहा कर्मचारी युनियनचे कार्यकर्ते शुक्रवारी आपल्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर एकत्र आले.

अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी संप

हुलसूर/एम.एस.हुलसुरकरः तालुक्यातील विविध गावांच्या अंगणवाडी कर्मचारी युनियन आणि अक्षरदसोहा कर्मचारी युनियनच्या मागण्यांसाठी शेकडो अंगणवाडी आणि अक्षरदसोह कार्यकर्ते शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर एकत्र आले."सरकारने आम्हाला संरक्षण द्यावे व कोरोना मध्ये मृत्यू झालेल्यांना भरपाई, किमान वेतन आणि पेन्शन द्यावी, अशा मागण्या यावेळी कार्यकर्त्यांनी केल्या. अंगणवाडी आणि साथीदार कर्मचाऱ्यांना वेळेत लसीकरण करावे, अतिरिक्त दहाहजार रुपये मासिक भत्ता द्यावा, केंद्रीय योजना कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी अधिक अर्थसंकल्पीय सहाय्य वाटप करावे आणि एमबीटीआयसह सुमारे वीस मागण्या मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांच्या माध्यमातून केलेल्या निवेदनाद्वारे संबोधित करण्यात आल्या.

"सरकार केवळ आश्वासने देते,आमच्या समस्येला कोणीही प्रतिसाद दिला नाही. आम्ही दिवसातून दहा ते बारा तास काम केले तरी काही फायदा झाला नाही, असा आरोप आंगणवाडी कार्यकर्त्यांनी केला आहे. पुर्वी बसवकल्याण तालुका असल्याने तेथे कामकाज सुरू होते पण हुलसूर तालुका झाल्याने हुलसूर तालुक्यातील सर्वाचे कामकाज येथेच सुरू करावे अशी मागणी व निवेदन तहसीलदार शिवानंद म्हेत्रे यांना देण्यात आले आहे. यावेळी भूमापन अधिकारी मोनेश्वर स्वामी, अंगणवाडी कार्यकर्ते सुनंदा मानकरे, आरती अडप्पा, अंजना ईश्वर, संपता, लक्ष्मी मोरे, अनुसया बिरादार, माया सिद्धार्थ, जया, रेखा, शबाना, सुनंदा आणि इतर अनेकजण उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.