अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव तर नाही - चंद्रकांत पाटील

पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न? अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाब..नाही तर...??

अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव तर नाही  - चंद्रकांत पाटील

मुंबईः परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशातच याप्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून विरोधकांकडून सातत्याने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजपे मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर सरकारने एक पाउल मागे येत या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमून अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्याच दरम्यान अनिल देशमुख यांनी रात्री एक महत्त्वाचे ट्वीट केले आहे. त्यासोबत एक पत्रही जोडले आहे. याच पत्राचा आधार घेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.

अनिल देशमुखांकडून २१ तारखेला पत्र लिहून घेतलं गेलं ते ४ दिवस प्रलंबित ठेवून २४ तारखेला प्रसिद्ध केले. १०० कोटी वसुलीचे आरोप व पत्रात व्हॉट्सअॅप एसएमएसची भाषा. पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न? अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव तर नाही? अशी शंका चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.