महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा, ६६६ पदांची भरती

अर्ज प्रक्रिया २९ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार.

महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा, ६६६ पदांची भरती

मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दुय्यम परीक्षेची जाहिराती जाहीर करण्यात आली आहे. एमपीएससीने आज महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ ची ६६६ पदांची जाहिरात जारी केली आहे. याद्वारे पोलीस उपनिरिक्षक ३७६, राज्य कर निरीक्षक १९० आणि सहायक कक्ष अधिकारी १०० पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ साठीचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात २९ ऑक्टोबर दुपारी ३ वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक १९ नोव्हेंबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ५४४ तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी ३४४ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं भरता येईल.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.