अवैद्य शस्त्र बाळगणाऱ्या आणखी एकास पोलिसांकडून अटक

अवैद्य शस्त्र विक्री करणाऱ्यांवर आता पोलीसांची करडी नजर, आणखी एकास अटक..

अवैद्य शस्त्र बाळगणाऱ्या आणखी एकास पोलिसांकडून अटक

सुमित दंडुके/औरंगाबाद: ४ जुलै रोजी पोलीसांनी ऑनलाईन शस्त्र खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. यात तब्बल ४९ घातक शस्त्रे जप्त करण्यात आली होती. तसेच मुख्य आरोपीला अटक करुन त्याच्याकडून शहरात आणखी कोणाला शस्त्र विक्री केली याचा शोध सुरु होता. तेव्हा आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलीसांनी शहरातील विविध भागातून ४ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या घराची झडती घेतली असता तेथे तलवारी, कुकरी आढळल्या होत्या.

त्यानंतर पुन्हा आरोपी इरफान खान उर्फ दानिश खान याने पोलीसांना माहिती दिली की, जुबेर कुरैशी उर्फ जुब्बू (वय.२०, रा.बारी कॉलनी) याच्याकडे धारदार शस्त्रे आहेत. पोलीसांनी लगेच जुबेर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून १ तलवार आणि १ कुकरी असे दोन शस्त्र जप्त करण्यात आली. आरोपी जुबेर विरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

कुरीयरने मागविल्या तलवारी, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
जिन्सी आणि पुंडलीकनगर पोलीसांची मोठी कारवाई, ४१ तलवारी, ६ कुकरी आणि २ चाकू आरोपीकडून घेतले ताब्यात...

सदरील कारवाई जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोकुळ ठाकुर, बनसोड, भाऊसाहेब जगताप, बाळू थोरात, हारुन शेख, जगदाळे, बावीस्कर यांनी यशस्वी पार पाडली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.