औरंगाबादमध्ये आणखी एका खुनाचा थरार, चाकुने भोसकुन तरुणाची हत्या

घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

औरंगाबादमध्ये आणखी एका खुनाचा थरार, चाकुने भोसकुन तरुणाची हत्या

औरंगाबाद : शहराला आणखी एका खुनाच्या घटनेने हादरून सोडले आहे. दारू पिण्यावरून झालेल्या वादातून विश्वास वाईन शॉपीच्या काउंटर वरच एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना काल रात्री सव्वानऊ वाजेच्या दरम्यान घडली. खून केल्यानंतर आरोपी पळून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सिद्धार्थ रंगनाथ हिवराळे(वय.३५) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, बजरंग चौकात सिद्धार्थ दारु विकत घेत असताना विशाल आगळे याने धावत येऊन त्याच्या पोटात जोराने 'चाकू मारला आणि विशालने तेथून पळ काढला असल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली. अवघ्या तीन सेकंदाची ही घटना वाईन शॉप मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. तसेच फरार आरोपीचा शोध पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घेत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.