विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन तपासणी

हिंगोली पोलिसांचे पथक तैनात

विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन तपासणी

हिंगोलीः जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अत्यावश्यक कामा शिवाय नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आदेश देण्यात आले असतानाही अनेक नागरिक विनाकारण बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे शहरातील नांदेड नाका परिसरात हिंगोली शहर पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले असून फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजन तपासणी करण्यात येत आहे. आज दिवसभरात या तपासणीत सहा नागरिक पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदीचा आदेश लागू आहे. या दरम्यान नागरिकांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तरीही अनेक नागरिक विनाकारण बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर उपअधीक्षक यातिष देशमुख व पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या आदेशावरून शहरातील नांदेड नाका परिसरात तपासणी पथक नेमण्यात आले आहे.

विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची या ठिकाणी अँटिजन तपासणी सुरू आहे.

आज दिवसभरामध्ये या ठिकाणी १०३ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. ज्यामध्ये सहा नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे. शासनाच्या आदेशांचे पालन करुन नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी केले आहे. या तपासणी केंद्रावर आमदार संतोष बांगर यांनी भेट देऊन स्वतःची तपासणी करून घेतली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.