लैंगिक शोषण प्रकरणी अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस स्टेशनला दाखल.

1 min read

लैंगिक शोषण प्रकरणी अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस स्टेशनला दाखल.

अनुराग सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोलिस स्थानकात दाखल झाला असून, त्याला यासंबंधी प्रश्नोत्तरे केली जाणार आहेत.

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आज (1 ऑक्टोबर) रोजी वर्सोवा पोलिस स्थानकात पायल घोष प्रकरणी चौकशीसाठी हजार झाला आहे. अभिनेत्री पायल घोषने दाखल केलेल्या लैंगिक शोषण तक्रारीनंतर अनुरागला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. अनुराग सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोलिस स्थानकात दाखल झाला असून, त्याला यासंबंधी प्रश्नोत्तरे केली जाणार आहेत.

‘अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा. ज्यामुळे या माणसाचे खरे रुप जगासमोर येईल. माझ्या या वक्तव्यामुळे मला धोका होऊन माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा’, असे ट्विट पायलने घोषन काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटमध्ये टॅग करत आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती.

‘तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू घाबरु नको, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल’, असे आश्वासनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायलला दिले. तसेच पायलला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात यावी याबाबतही राज्यपालांशी चर्चा झाली. त्यावर, ‘मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी याबाबत बोलतो. ते पायलला सुरक्षा देतील’, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

अनुरागने आरोप फेटाळले

‘क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतके खोटे बोललीस की, स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात सामील करून घेतलेस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकेच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले गेले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत’, असे ट्विट करत अनुराग कश्यपने सगळे आरोप फेटाळून लावले होते.