....अन्यथा राज्यभर न.प. कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

1 min read

....अन्यथा राज्यभर न.प. कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

प्रदेशाध्यक्ष शिंदे यांचा इशारा

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील विविध कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी आज कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. याची शासनाने दखल न घेतल्यास राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचारी संवर्ग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डी.पी. शिंदे यांनी दिला आहे.
राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद प्रमाणे कोषागार कार्यालयातून वेतन अदा करावे, सहाय्यक अनुदान देण्यात यावे, थकित निवृत्ती वेतन देण्यात यावेत यासह जवळपास वीस मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. सदर मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्या करिता आज नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संपूर्ण राज्यात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष डी.पी. शिंदे यांनी दिला आहे. या वेळी नगरपरिषदेचे विनय साह, बाळू बांगर, संदीप घुगे, विजय हेलचल, मस्के आदि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.