भाजप जिल्हा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी मल्लिकार्जुन सौंदळे यांची नियुक्ती.

1 min read

भाजप जिल्हा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी मल्लिकार्जुन सौंदळे यांची नियुक्ती.

भाजपाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री भागवतराव बाजगिर यांनी केली निवड घोषित.

सिध्देश्वर गिरी/परभणी: परभणी येथील जिल्हा संपर्क कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.श्री.सुभाष कदम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.रामप्रभू मुंढे ओबीसी प्रदेश चिटणीस श्री.रामकिशन रौंदळे, जिल्हा संघटक सरचिटणीस श्री. बाबासाहेब जामगे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब भालेराव युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.सुरेश भुमरे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भागवतराव बाजगिर, सोनपेठ मा.तालुकाप्रमुख महादेव गीरे पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते भाजप जिल्हा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी मल्लिकार्जुन सौंदळे निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले. जिल्हा सरचिटणीस पदी श्री.मल्लिकार्जुन सौंदळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल मा.जिल्हाउपाध्यक्ष बालाप्रसाद मुंदडा, जेष्ठ नेते रमाकांतराव जहागीरदार, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, तालुकाध्यक्ष सुशील रेवडकर, माजी तालुकाध्यक्ष महादेव गिरे , युवा नेते रंगनाथराव सोळंके, संतोष दलाल, राजाभाऊ निळे अदिसह भाजपाचे पदाधिका-यां नी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.