MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का?- अमेय खोपकर

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी खा.इम्तियाज जलील यांच्यावर खोचक टिका

MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का?- अमेय खोपकर

औरंगाबादः औरंगाबाद शहरात लावण्यात आलेले लाॅकडाऊन रद्द करण्यात आले असुन लाॅकडाऊ रद्द झाल्याने जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन काल इम्तियाज जलील यांनी जल्लोष साजरा केला होता. यावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही जलील यांच्यावर ट्टिट करून टिका केली आहे.

३१ मार्च रोजी होणारे लाॅकडाऊन रद्द झल्याने इम्तियाज जलील यांच्या संमर्थकांनी त्यांच्या आॅफिस वर मोठ्या प्रमात गर्दी करत जल्लोष केला . कार्यकर्त्यानी जलील यांना पुष्पहार देखिल घातले, रस्तावर मिरवणुक सुद्धा काढली .कोरोनाचा इम्तियाज जलील आणि त्यांच्या कर्याकरत्यांवर विसर पडला आहे. यावरून अमय खोपकर असे म्हणाले की MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? (Are the leaders of MIM wrapped in shame and tied on their heads?) संभाजीनगरमघ्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे असे मनसे नेते अमेय खोपकरांनी म्हटले आहे.

“हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे” अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे.

खा.जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अन्यथा रस्त्यावर उतरु - केनेकर
जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउन रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर खा.इम्तियाज जलील यांनी नियमांचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला...
अखेर खा.इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल
अनेक स्तरातून मागणी झाल्यानंतर इम्तियाज जलील यांच्यासह ११ जणांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.