अर्णब गोस्वामींना जामीन मंजूर

1 min read

अर्णब गोस्वामींना जामीन मंजूर

अन्वय नाईक यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी याना अटक करण्यात आली होती.

मुंबई: रिपब्लीक भारत चे संपादक अर्णब गोस्वामीला आज सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अन्वय नाईक यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी याना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर अर्णब यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. पण उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अर्णब यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली आणि अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.