थ्री स्टार, फाइव्ह स्टार हॉटेल्सना गंडवणारा अटकेत

महागड्या सिगारेटी,दारू पिऊन व्हायचा फरार...

थ्री स्टार, फाइव्ह स्टार हॉटेल्सना गंडवणारा अटकेत

औरंगाबाद : महागड्या हॉटेल्समध्ये कॉन्फरन्स घेण्याच्या बहाण्याने राहून तेथील महागड्या सिगारेट, दारु पियुन नंतर पैसै न देताच पळून जाणाऱ्या भामट्याला पकडण्यात वेदांतनगर पोलीसांना यश आले आहे. भीमसेंट जॉन (वय.६५, रा.थुथूखेडी,तमिळनाडू) असे या भामट्याचे नाव आहे. त्याने आतापर्यंत देशभरातील विविध हॉटलांना गंडा घातला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच शहरातील रामा इंटरनॅशनल, अॅम्बेसिडर, लेमन ट्री या हॉटेलांना देखील या भामट्याने गंडा घातला आहे.

किज हॉटेलच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेलमध्ये थांबलेल्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर हॉटेल किजचे मालक चौधरी यांनी पोलिसांना कळविले. त्याने खोटे नाव सांगितले होते. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आधार क्रमांकावरून त्याची माहिती काढली. त्याच्या विरोधात कफ परेड येथील पोलिस ठाण्यात २०१७ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी सांगितले. पोलिसांनी जॉनला ताब्यात घेतले आहे. त्याला प्रथम २०१७ मध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याने दिल्ली, मुंबई, हैदराबादसह देशातील विविध भागातील दोनत्वर हॉटेलची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

पगार बुडविल्याचा राग म्हणून सुरु केली फसवणूक
जॉन तमिळनाडूत एका हॉटेलमध्ये काम करीत होता. त्याचे ३७०० रूपये हॉटेलमालकाने बुडविले. हॉटेल मालकाने पगार बुडविल्यानंतर त्याने फसवणुकीचा धंदा सुरू केला. महागड्या हॉटेलमध्ये इन्व्हेंट किंवा अन्य महत्त्वाचे कारण सांगून जॉन खोट्या नावाने रूम बुक करायचा. विविध सेवांचा तो फुकटात आस्वाद घ्यायचा. नंतर कोणालाही न सांगता निघून जायचा.

फुलंब्रीत वीज पडून तरुणी ठार, एक जखमी
लोहगड नांद्रा येथील सात शेळ्या व बाभूळगावात एक गाय व बैलही वीज कोसळल्यामुळे मृत्युमुखी...

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.