संजय राठोडांना अटक करा, भाजप महिला मोर्चा आक्रमक

भाजप महिला मोर्चातर्फे अमरप्रीत चौकात चक्काजाम आंंदोलन...

संजय राठोडांना अटक करा, भाजप महिला मोर्चा आक्रमक

सुमित दंडुके/औरंगाबाद : पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर येत आहे. संजय राठोड यांना अटक करुन या घटनेची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी आज भाजप महिला मोर्चातर्फे अमरप्रीत चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

पोलीसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारली असताना देखील आंदोलन करण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांना क्रांतीचौक पोलीसांनी ताब्यात घेतले. यावेळी महिला पदाधिकारी व पोलीस यांच्यात झटापट झाली.
bjp_2-1
'संजय राठोडांना अटक झालीच पाहीजे, संजय राठोड राजीनामा द्या, तिघाडी सरकार हायहाय, भारतीय जनता पक्षाचा विजय असो'. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलन करु नका, अशा सुचना पोलीसांनी आंदोलनाच्या सुरुवातीलाच पदाधिका-यांना दिल्या होत्या. मात्र पोलीसांचे न ऐकता आंदोलन सुरुच ठेवल्याने पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
या आंदोलनामुळे क्रांतीचौक ते मोंढा पुल दरम्यान काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलीसांनी ही वाहतूक सुरळीत केली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.