फायटर एअर क्राफ्टसह गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला नाशिकातून अटक

1 min read

फायटर एअर क्राफ्टसह गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला नाशिकातून अटक

एक व्यक्ती परदेशी व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची व त्याच्याशी संबंधीत संवेदनशील माहिती तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमाने बनविण्याच्या कारखान्या संदर्भातील गोपनीय माहिती पुरवत असल्याची टीप नाशिक एटीएसला मिळाली होती.

मुंबई  : भारतीय बनावटीच्या विमानाची माहिती पुरवणाऱ्या भामट्याला दहशतवाद विरोधी पथकांनं (ATS) अटक केली आहे.दीपक शिरसाट असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचारी आहे. तो पाकिस्तानातील आयएसआय (ISI) या गुप्तहेर संघटनेसाठी काम करत होता. आरोपीनं आर्टलरी सेंटरमध्ये हेरगिरी करत ISIला फायटर एअर क्राफ्टसह गोपनीय जागांच्या छायाचित्रालह माहिती पाठवल्याचं समोर आलं आहे.तो विमाने बनविण्याच्या कारखान्या संदर्भातील गोपनीय माहिती पुरवत असल्याची टीप नाशिक एटीएसला मिळाली होती. त्यानंतर या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक एटीएसने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

एक व्यक्ती परदेशी व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची व त्याच्याशी संबंधीत संवेदनशील माहिती तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमाने बनविण्याच्या कारखान्या संदर्भातील गोपनीय माहिती पुरवत असल्याची टीप नाशिक एटीएसला मिळाली होती. त्यानंतर या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक एटीएसने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

ओझर, नाशिक स्थित भारतीय बनावटीची विमाने बनविणाऱ्या "हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड " या कंपनीमधील एक कर्मचारी (दीपक शिरसाट) पाकिस्तानच्या ISI या गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानाच्या संवेदनशील तांत्रिक तपशिलाची , हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या नाशिक येथील विमान कारखाना तसेच कारखाना परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची तसेच गोपनीय माहिती पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संघटनेस पुरवत होता. त्यावरून त्याच्याविरुद्ध कलम 3 , 4 , आणि 5 शासकीय गुपिते अधिनियम 1923 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीच्या ताब्यातून 3 मोबाइल हँडसेट, 5 सिमकार्ड, दोन मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहे. सदर साहित्य विश्लेषणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आले आहेत. आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.