
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत अचानक बिघडली असून कालपासून त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच रविवार (दि.7) दुपारपासून अरविंद केजरीवाल यांनी आपल्या बैठका रद्द केल्या आहेत. ते कोणालाही भेटले नसून स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे.
दिल्लीत आतापर्यंत कोरोना रूग्णांची संख्या 27 हजार 654 इतकी आहे. 761 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.