लातूर : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार व नेहरू युवा केंद्र संगठन मुख्यालय नवी दिल्ली मार्फत निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून चाकूर तालुक्यातील खुर्दळी चे माजी सरपंच संगमेश्वर माधवराव जनगावे यांची लातूर जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. लातूर जिल्हयात युवा विकासाच्या क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करने व युवा चळवळीला चालना देणे, या उद्देशाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली.
विविध माध्यमातून केलेल्या कार्यांची दखल घेऊन संगमेश्वर जनगावे यांची या समितीच्या सदस्यपदी जिल्हाधिकाऱ्यांनी निवड केली. या निवडिबद्दल त्यांचे आमदार बाबासाहेब पाटील, युवराज पाटील आदिनी अभिनंदन केले