एनलायझरच्या बातमीचा परिणाम, अखेर त्या रस्त्याच्या कामाचा गुत्तेदार बदलला.

अखेर शिर्शी-शिरोरी कान्हेंगांव रस्त्याच्या कामाचा गुत्तेदार बदलला.तालुक्यातील रस्त्याची बोगस कामे करणा-यावर केव्हा कार्यवाही होणार?

एनलायझरच्या बातमीचा परिणाम, अखेर त्या रस्त्याच्या कामाचा गुत्तेदार बदलला.

सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी: महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या अधिपत्याखाली करण्यात येणाऱ्या कामाचा मागील अनेक दिवसांपासून बोजवारा उडाला आहे.
अशी बोगस कामे करत स्व:तचे उखळ पांढरे करत सामान्य नागरिकांच्या जिवितहनीस कारणीभूत ठरणाऱ्या गुत्तेदारावर कार्यवाही करण्याची मागणी युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी एका निवेदनाद्वारे मागील वर्षी ग्रामीण रस्ते विकास संस्था पुणे यांच्याकडे केली होती.
याच रस्त्या संदर्भात  एनलायझर न्यूज ने सतत  वार्तांकन केले. आमच्याच बातम्यांची  दखल घेऊन शिर्शी-शिरोरी कान्हेंगांव या रस्त्याचे काम साईनाथ कन्ट्रक्शन कंपनी परळी कडून रद्द करण्यात आल्याचे,  लेखी पत्र परभणी येथील कार्यालयास प्राप्त झाल्याचे आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत.
सोनपेठ तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून ग्रामीण भागातील रस्त्यांसह मुख्य रस्त्यांना भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे.यात जबाबदार अधिकाऱ्यांनीही आपले हात ओले केले असून. सोनपेठ तालुक्याच्या विकासाचा फज्जा अधिकारी आणि पांढऱ्या कपड्यातील सगळ्यांनी उडवला आहे.यामुळेच सामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळ खेळण्याचे प्रकार रस्त्याच्या माध्यमातून समोर येत आहेत.
सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव-शिर्शी-शिरोरी या रस्त्यासह तालुक्यातील आणि रस्त्याच्या बाबतीतही हाच प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान ग्रामीण रस्ते अभियानाच्या धर्तीवर ग्रामीण भागातील एकमेकांना जोडण्यासाठी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर करुण घेण्यासाठी शासनयंत्रणा सहभागी आहे.मात्र जुन्या लोकप्रतिनिधीच्या मर्जीने या रस्त्याचा मलिदा लाटण्यात बोगस पोटगुत्तेदार सामील झाल्याने तालुक्यातील रस्त्यांचे तीन तेरा वाजले होते.
परभणी जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असणार्‍या सोनपेठ तालुक्याच्या विकासात प्रशासकीय यंत्रणेवर लोकप्रतिनिधीही सामील आहेत.विकासकामे करून घेण्यासाठी एकीकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी समन्वय ठेवून आपली कामे मार्गी लावतात. मात्र सोनपेठ तालुक्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी कर्मचारी हे विकासकामांची ऐशी का!तैसी करत आपले चांगभले करत आहेत.यामुळेच सोनपेठमध्ये प्रत्येक विभागाच्या बाबतीत विकासकामात अडथळे निर्माण होत आहेत.
सोनपेठ तालुक्यातील रस्त्याच्या बाबतीत गुत्तेदार,पोटगुत्तेदार,लोकप्रतिनिधी यांनी मलईचा खेळ चालवला आहे.सोनपेठ तालुक्यातील प्रलंबित रस्त्याच्या कामाची माहिती एका कार्यकर्त्याने मिळवून यावर तक्रार दिली असता.या तक्रारीतून बाहेर जिल्ह्यातील गुत्तेदार आणि पोटगुत्तेदार यांनी आपले उखळ पांढरे केल्याचा प्रकार समोर आला आहे.यात राज्यमार्ग २२५ ते शिर्शी-शिरोरी-कान्हेगाव-खडका या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून परळी येथील साईनाथ कन्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले होते. सदर कामाचा कार्यारंभ आदेश २३ ऑगस्ट २०१८ रोजी काढण्यात आला होता.तर सदर कामाची मुदत एका वर्षाची असल्याने साईनाथ कंट्रक्शन कंपनीच्या मुंडे नावाच्या गुत्तेदांंराने सदर काम एका वर्षात पूर्ण करणे बंधनकारक होते.मात्र अधिकार्‍यांच्या वरदहस्तामुळे काम पूर्ण करण्यास विलंब केल्याने युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी परभणी येथील कार्यालयास या कंपनीच्या बाबतची तक्रार दिली.
या तक्रारीत अधिकाऱ्यांनी सूचनावजा नोटीस काढून सदरच्या कार्यकर्त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला,मात्र रखडत ठेवून अर्धवट केलेल्या कामामुळे अपघाताचे प्रमाण अधिक वाढत असल्याने मोकाशे यांनी पुणे येथील नियंत्रीत अधिकाऱ्यांकडे या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची तक्रारवजा विनंती केली. मात्र कागदाच्या बाजारात मोकाशे यांचे समाधान करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर मोकाशे यांनी परभणी येथील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत गुत्तेदार बदलण्याची मागणी केली.तेव्हा कुठे परभणी येथील कामचुकार अभियंत्यांनी गुत्तेदार बदलण्याचा शिफारसरुपी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवला.आणि तब्बल सात महिन्यानंतर सदर रस्त्याचे काम साईनाथ कन्ट्रक्शन कंपनीकडून काढून घेण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
अशाचप्रकारे सोनपेठ व पाथरी तालुक्यातील काही रस्त्यांची कामे परभणी येथील प्रिया कंट्रक्शन कंपनीने केलेली आहेत.सदर रस्त्याची कामे अत्यंत बोगस करत दर्जाहीन कामे करण्यात आल्याच्या तक्रारी होत आहेत.सदरच्या कामाबाबत प्रिया कंट्रक्शन कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकावर कार्यवाही करण्याची मागणीही जोर धरत आहे.या संपुर्ण प्रसंगी एनलायझर न्यूज च्या  माध्यमातून वृत्तसंकलन करण्यात आल्याने न्याय मिळाल्याची भावना युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी व्यक्त केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.